मुंबई – नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येने राज्यात पुन्हा एक हजारचा टप्पा पार केला. राज्यात बुधवारी 1 हजार 81 बाधितांची नोंद झाली. याआधी राज्यात 24 फेब्रुवारी या दिवशी सर्वांधिक 1 हजार 124 बाधित आढळले होते.
राज्यातील दैनंदिन बाधित संख्येत एकट्या मुंबईचा वाटा 70 टक्के इतका आहे. मुंबईत बुधवारी 739 बाधितांची नोंद झाली. जवळपास चार महिन्यांनी तेवढ्या संख्येने मुंबईत नवे बाधित आढळले.
त्या शहरात 4 फेब्रुवारीला 846 बाधितांची नोंद झाली होती. राज्यात दैनंदिन संख्या वाढली असली तरी तेवढ्या कालावधीत एकही बाधित दगावला नाही. ती दिलासादायी बाब मानली जात आहे. राज्यात सध्या 4 हजार 32 सक्रिय बाधित आहेत.