पुणे शहरात नवीन 201 करोनाबाधित

8 रुग्णांचा मृत्यू; शहरात 2 हजार 10 ऍक्‍टिव्ह रुग्ण

 

पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 201 नवीन करोनाबाधित आढळले असून, 204 रुग्ण बरे झाले आहेत. तर, उपचारादरम्यान पुण्यातील पाच जणांसह 8 रुग्णांचा मृत्यू झाला.

शहरातील ऍक्‍टिव्ह बाधितांची संख्या 2 हजार 10 इतकी असून, यापैकी 204 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

आतापर्यंत शहरात 1 लाख 85 हजार 558 बाधित आढळले असून त्यापैकी 1 लाख 78 हजार 795 रुग्ण बरेही झाले आहेत. तर, 4 हजार 753 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरात आतापर्यंत 10 लाख 19 हजार 736 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.

लसीकरणालाही वेग

शहरात 16 जानेवारीपासून आरोग्य सेवकांना करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. सुरवातीला “को विन’ ऍपमधील तांत्रिक अडचण तसेच आरोग्य सेवकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद यामुळे लसीकरणाचा वेग काहीसा कमी होता. मात्र, आता 14 केंद्रांवर लसीकरण करण्यास प्रारंभ झाला असून, शुक्रवारी एका दिवसांत निश्‍चित केलेल्या उद्दीष्टापैकी 88 टक्‍के आरोग्य सेवकांनी लस घेतली. वास्तविक, 14 केंद्रावर 100 आरोग्य सेवकांना लस देण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात 7 केंद्रांवर 100 आणि त्याहून अधिक सेवकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 186 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसरीकडे मात्र भारती हॉस्पिटलमधील दोन केंद्रांवर अनुक्रमे 30 आणि 21 सेवकांनीच लस घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.