मुंबई, – करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.
तसे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत.
यापूर्वी लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारने वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.