नगर (प्रतिनिधी) – नगरशहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच असून, सलग दुसर्या दिवशी बाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. आज दिवसभरात तब्बल 857 नवे बाधित आढळले आहेत. त्यामध्ये नगर शहरामध्ये 291 बाधित आहेत. तर 3 हजार 897 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर 85 हजार 455 इतकी रुग्णसंख्या झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 319, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 475 आणि अँटिजेन चाचणीत 63 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 124, अकोले 5, जामखेड 5, कर्जत 12, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 14, नेवासे 1, पारनेर 11, पाथर्डी 3, राहाता 40, राहुरी 5, संगमनेर 18, शेवगाव 10, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 10, इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 166, अकोले 9, कर्जत 6, कोपरगाव 31, नगर ग्रामीण 19, नेवासे 17, पारनेर 10, पाथर्डी 6, राहाता 69, राहुरी 21, संगमनेर 64, शेवगाव 5, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट 5 इतर जिल्हा 10, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 63 जण बाधित आढळून आले. मनपा 1, जामखेड 32, नगर ग्रामीण 1, नेवासे 9, पाथर्डी 10, राहाता 2, संगमनेर 2, श्रीरामपूर 6, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 161, अकोले 10, जामखेड 11, कर्जत 5, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 18, नेवासे 15, पारनेर 11, पाथर्डी 7, राहाता 77, राहुरी 21, संगमनेर 43, शेवगाव 41, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 21, कॅन्टोन्मेंट 5 आणि इतर जिल्हा 6, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या: 80369
उपचार सुरू असलेले रुग्ण:3897
मृत्यू:1189
एकूण रुग्णसंख्या:85455