हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमध्ये कोविड-19 च्या रुग्णांची संख्या एकदम झपाट्याने वाढायला लागली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या प्रमाणापेक्षा वाढायला लागल्याने वैद्यकीय यंत्रणांवर ताण यायला लागला आहे.
हॉंगकॉंगमध्ये कोविड प्रमाण शून्य ठेवण्यावर प्रशासन ठाम असतानाच हे प्रमाण वाढायला लागले आहे. या आठवड्यात दररोज हॉंगकॉंगमध्ये 2 हजार करोना रुग्णांची नोंद होते आहे.
करोना रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मात्र तरिही रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय यंत्रणांवर ताण येतो आहे. कॅरिटास मेडीकल सेंटरच्या इमारतीच्या बाहेर खाटा टाकून रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या वाढत्या करोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली असून ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी हॉंगकॉंगच्या प्रशासकीय अधिकारी कॅरी लाम यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे.