पुणे : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 93 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनाच्या बाधेपासून दूर असणाऱ्या सांगली जिल्ह्यात हे रुग्ण आढळले आहेत. हे चारही रुग्ण सौदी अरेबियातून आले होते.
इस्लामपूरमधील वास्तव्यास असणाऱ्या या रुग्णांध्ये कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या 93 वर पोहोचली आहे. पुण्यात दिवसभरात एका रुग्णाला बाधा झाली तर मुंबईत 14 जणांना बाधा झाली. सांगलीतून एकूण 12 जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते.
राज्यात आजच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदी जारी केली आहे. त्यानंतर या चार रुग्णांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. अत्यावश्यक सेवेशिवाय राज्यातील लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत.