#करोना_इफेक्ट : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज ढकलले पुढे

पुणे : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव व्ही.व्ही.पळणीटकर यांंनी दिली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात चौकशी आयोगाची सुनावणी होणार होती. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता ती सुनावणी पुढील दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 4 एप्रिल रोजी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. तसेच कोणत्याही परिस्थितीत या तारखेत बदल होणार नाही अथवा पुढची तारीख मिळणार नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले होते. परंतु आता आयोगाने आणखी साक्षीदार तपासणे, पोलिस आणि राजकीय नेते यांची साक्ष नोंदवणे या सगळयासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक वेळ मिळणार नसल्याचे पळटणीकर यांनी सांगितले आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असणाऱ्या अनेकांची धरपकड केली आहे. यातील 9 जण सध्या अटकेत आहेत. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीची बाजू घेत शरद पवार यांनी या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तडकाफडकी निर्णय घेत हा गुन्हा एनआयएकडे सोपवला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शरद पवार यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने पवार यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.