दोन महिन्यांनंतर आढळला बाधित
तळेगाव ढमढेरे(प्रतिनिधी) – येथील करोना संशयित अखेर करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गावात दोन महिन्यांनंतर पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील करोनाबाधिताच्या घरातील 7 जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, शेजारील गावात करोनाचे रुग्ण एका पाठोपाठ सापडत असल्याने तशी स्थिती आपल्या गावात होवू नये यासाठी प्रशानासनाबरोबरच नागरिकांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजे, गर्दी करणे, परगावी जाणे, वयस्कर किंवा आजारी नागरिकांनी घराबाहेर पडण्यास टाळावे, अनावश्यक घराबाहेर पडू नका, सॅनिटायझरचा वापर करावा, लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे.