नवी दिल्ली : देशातील करोनाच्या संसर्गात थोड्या प्रमाणात घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3324 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 2876 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3688 नवीन करोना रुग्णांची नोंद आणि 50 जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92 इतकी झाली आहे.
India reports 364 fewer COVID-19 cases, logs 3,324 new infections in last 24 hours
Read @ANI Story | https://t.co/2y63TE0ar7#COVID19 #CoronavirusUpdates #CoronavirusPandemic #COVID pic.twitter.com/CMdZEW5Mty
— ANI Digital (@ani_digital) May 1, 2022
शनिवारी दिवसभरात देशात 2876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 40 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 36 हजार 253 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 4 लाख 71 हजार 87 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.