नवी दिल्ली – देशभरातील ७०० हून अधिक जिल्ह्यांपैकी १७० जिल्हे कोरोना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले असून आणखी २०७ जिल्ह्यांना संभाव्य हॉटस्पॉट घोषित करण्यात आलंय. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली असून हॉट स्पॉट घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यांतील कंटेनमेंट झोनमध्ये आता घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये कोव्हीड-१९, इन्फ्लूएन्झा व सरी या आजारांसाठी चाचणी करण्यात येईल.
हॉट स्पॉट घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण न सापडेपर्यंत व सध्याचे सर्व कोरोनाबाधित बरे होईपर्यंत येत्या २८ दिवसांसाठी निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत. ग्रामीण भागांमध्ये कोरोना हॉटस्पॉटचा परीघ ३ किलोमीटरचा तर बफर झोन ७ किलोमीटरचा असणार आहे.