लाॅकडाऊनमध्ये सिगरेट विक्री करणाऱ्यांकडून 39 लाखांचा माल जप्त

पुणे : लाॅकडाऊनच्या काळात जीवनावश्यक साहित्य मिळण्यात अडचणी एकीकडे निर्माण हाेत असतानाच, दुसरीकडे काही व्यापारी सिगरेट विक्री करत असल्याचे पाेलीस तपासा दरम्यान उघडकीस आले आहे.  खंडणी आणि अंमली पदा‌र्थ विराेधी पथकाने याप्रकरणी सिगारेट विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 39 लाख रुपयांचे सिगरेट जप्त केल्याची माहिती पाेलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दिली. 

याप्रकरणी दुकान मालक शशीकांत रामस्वरुप चामडिया (वय-43,रा.काेरेगावपार्क,पुणे) यांच्या विराेधात मार्केटयार्ड पाेलीस ठाण्यात भादंवि कलम 188, 269, 270, 273 आणि राष्ट्रीय व्यवसाथपन कायदा कलम 51 (ब), महाराष्ट्र काेविड 19 उपाय याेजना कलम 2020 चे कलम 11, संसर्गजन्य राेग अधिनियम 1857 अधिनियम कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.