जामखेड (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असून आज केलेल्या 180 जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत तब्बल 33 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 147 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत यामधे एकाच गावातील तब्बल १४ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे
जामखेड तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या 300 च्या घरात गेली असून नागरिकांकडून कोरोना बाबतीत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे आरोळे हाॅस्पिटल येथे रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये शहरासह ग्रामीण भागात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज झालेल्या 180 जणांच्या तपासणीत 32 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे एक जण खाजगी लॅब मध्ये पाॅझिटिव्ह आला आहे.
यामध्ये शहरातील काझी गल्ली 1.टेकाळे नगर 1. सदाफुले वस्ती 1. कुंभारतळे 4.अन्य ठिकाणचा 1 तर ग्रामीण भागातील खर्डा 3, राजुरी 2,फक्राबाद 1,नान्नज 1,खुरदैठण 1, धोंडपारगाव 14, दौंडाचीवाडी 2, साकत 1,व खाजगी लॅब मध्ये 1 असे एकुण तब्बल 33 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे