#corona effect : उद्यापासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे पुन:प्रक्षेपण

मुंबई – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संभाजी महाराजांचा संपुर्ण जीवनप्रवास या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न कोल्हे यांनी केला. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट सुद्धा शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका (दि. ३०) उद्या पासून म्हणजेच सोमवार ते शनिवार संध्याकाळी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.