नवी दिल्ली – देशभरात करोनाने थैमान घातलं आहे. दररोज करोनामुळं होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे. ज्येष्ठ, तरुण आणि मुलंही करोनाचे बळी ठरत आहेत. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना करोनाने लक्ष्य केल आहे. अभिनेता राहुल व्होरा याचं देखील रविवारी करोनाने निधन झालं. मात्र राहुलने मृत्यूपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
राहुलने शनिवारी फेसबुकवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं की, ‘जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो. मी लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन. आता मी धैर्य गमावले आहे.’ यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनिष सिसोदिया यांनाही टॅग केलं होत. त्यापाठोपाठ आता राहुलची बायको ज्योती तिवारी हिने एक व्हिडीओ केला आहे.
व्हिडीओमध्ये राहुल हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाबद्दल भाष्य करत आहे. या व्हिडीओत राहुल वोहरा ऑक्सिजन मास्क हटवून सांगतो की, आजच्या घडीला याची खूप किंमत आहे. याच्याशिवाय रुग्ण तडफडतो. त्यानंतर हा मास्क पुन्हा घालून तो परत हटवतो आणि सांगतो यात काहीच येत नाही. यापुढे राहुल सांगतो की, नर्स आली तिला मी बोललो, तर तिने सांगितलं एक बॉटल असते त्यातून पाणी येत असतं. त्यानंतर ती निघून गेली. पुन्हा आवाज दिला तरी परतली नाही. १-२ तासानंतर पुन्हा येतात तोपर्यंत मेनेज करायला लागतं. मी या खाली मास्कचं करू काय? असा सवाल त्यांने उपस्थित केला.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअऱ करून ज्योती तिवारीने लिहिलं की, प्रत्येक राहुलसाठी न्याय हवा. माझा राहुल गेला हे सगळ्यांना माहिती आहे परंतु तो कसा गेला हे कोणालाही माहिती नाही. दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारे उपचार केले जातात. माझ्या पतीला न्याय मिळेल याची आशा आहे. मात्र आता पुन्हा एखादा राहुल जायला नको, असंही ज्योतीने म्हटलं आहे.