पुणे – करोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतण्याचे पुणे शहरातील प्रमाण 41 टक्के आहे तर, देशातील प्रमाण हे दहाने कमी म्हणजे 31 टक्के आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या शहराच्या यादीत पुणे शहराचा मुंबईनंतर दुसरा क्रमांक लागतो. सुरुवातीच्या काळात सोसायट्यांच्या भागात डोके वर काढलेल्या करोनाने नंतर शहरातील झोपडपट्टी आणि दाटवस्त्यांमध्ये शिरकाव केला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने फुगत आहे. या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आणि जिल्हा तसेच पोलीस प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.