लंडन – चीनच्या शास्त्रज्ञांनी वुहानमधील प्रयोगशाळेत करोनाचा विषाणू तयार केला. त्यानंतर त्यावर पांघरूण घालण्यासाठी हा विषाणु वटवाघळातून माणसात आल्याचे दाखवणारी उलटी मांडणी करण्यात आली, हे सिध्द करणारे स्फोटक संशोधन करण्यात आले आहे.
सार्स-कोव्ह-2 हा करोनाचा विषाणूचे वहन करण्यासाठी कोणताही विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाही. मात्र तरीही तसा पुरावा वुहान लॅबरोटरीत “गेन ऑफ फंक्शन’ प्रकल्पावर काम करणाऱ्या संशोधकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे नवीन संशोधन ब्रिटिश प्राध्यापक अँगस डल्गेरिश आणि नॉर्वेचे संशोधक डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी केले आहे, असे वृत्त “डेली मेल’ने दिले आहे.
चीनमध्ये आढळणाऱ्या वटवाघळांमध्ये आढळणारा नैसर्गिक करोना विषाणू घेतला. त्याचा संयोग घडवत अत्यंत घातक आणि अतीसंसर्गशील कोविड 10 चा विषाणू तयार करण्यात आला. केवळ प्रयोगशाळेतच हा विषाणू घडवल्याचे पुरावे कोविड 19 च्या नमुन्यात सापडत आहेत. या विषाणूच्या निर्मितीसाठी वर्षभर संशोधन सुरू असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत. मात्र, त्याकडे संशोधक आणि महत्त्वाच्या नियतकालिकांनी दूर्लक्ष केल्याचे डल्गेरिश आणि सोरेनसेन यांनी आपल्या संशोधनात नमूद केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
चीनच्या प्रयोगशाळेतील याचा तपशील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आला किंवा त्यात बदल करण्यात आला. या कृतीविषयी बोलणारे संशोधक एक तर बेपत्ता झाले किंवा त्यांना शांत करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला आहे. डेलीमेल डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या या वृत्ताने चीनमध्ये हा विषाणू निर्माण करण्यात आल्याच्या आरोपांवरील चर्चेला नव्याने चालना मिळणार आहे.
बायोफिजिक्स डिस्कव्हरी या प्रख्यात वैज्ञानिक त्रैमासिकात हे 22 पानी संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात चीनी संशोधकांनी अमेरिकन विद्यापीठाशी संबंधित काही संशोधकांसह करोना विषाणूंचे शस्त्र कसे बनवले याचे अनेक ठिपके डल्गेरिश आणि सोरेनसेन यांनी जोडून दाखवले आहेत.
“गेन ऑफ फंक्शन’ प्रकल्प हा नैसर्गिक विषाणूंना अधिक संसर्गशील कसा बनवत येतील यासाठी सुरू करण्यात आला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या प्रकल्पावर बंदी घातली होती. सोरेनसेन यांनी डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या विषाणूंच्या काटेरी आवरणांवर चार ऍमिनो ऍसिडचे (धनभार) पॉझीटिव्ह चार्ज आहेत. त्यामुळे मानवाच्या शरीररातील (णभार)निगेटिव्ह चार्जला तो घट्ट चिटकून राहतो. त्यामुळे तो अधिक संसर्गक्षम होतो.
हा घ्या पुरावा
हे चारही ऍमिनो ऍसिडचे चार्ज एकत्र आढळणे अशक्य असते. तीन चार्जसुध्दा निसर्गत: आढळणे दुर्मिळ असल्याचे सांगण्यात येत आहे. सलग चार चार्ज ही तर अशक्यातील अशक्य गोष्ट आहे, हे त्याचवेळी शक्य आहे, जेव्हा ते कृत्रीमरित्या बनवले जातील, असे डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी सांगितले