#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

पुणे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुस्लिम वस्ती असलेल्या कठोडाबाजार येथे काही दिवसांपूर्वी दानवे यांची एक छोटेखानी सभा झाली होती. या सभेत ‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, तुम्हाला कोणी मनाई करणार नाही’, असे वक्तव्य दानवे यांनी केले होते. या सभेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दानवेंवर जोरदार टीका होत असताना पाहायला मिळत आहे.

एकीकडे भाजप सरकार गोहत्याबंदी कायदा करत आहे तर दुसरीकडे भाजपचेच मंत्री या कायद्याची कत्तल करत आहेत. अशा आशयाची टीका दानवेंवर होताना पाहायला मिळत आहे. आपल्या चिरंजीवांसाठी घेतलेल्या या सभेत दानवे यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत भाषण केलं आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते या भागातील अवैध धंदे, सरकारी धान्याच्या काळाबाजाराची पाठराखण करीत असल्याचं दिसून येत आहे.

तसेच सरकारच्या कामाचा पाढा वाचताना ते गो हत्येबद्दल बोलले आहेत. त्यासाठी बकरी ईदच्या वेळचा एक प्रसंग सांगतानाही ते दिसत आहेत. बकरी ईदच्या वेळी मुस्लिम समाजातील काही लोक आपल्याकडं कत्तलीवरील बंदीची तक्रार घेऊन आले होते. रावसाहेब दानवे असेपर्यंत काहीही बंद होणार नाही, असं मी तेव्हा त्यांना म्हणालो होतो, अशी आठवण ते मतदारांना देत आहेत. हाच व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी एक प्रसिद्ध पत्रक काढून या संदर्भात खुलासा केला आहे. कठोरा बाजार येथील सभेत आपण असे बोललोच नाही, असा दावा रावसाहेबांनी केला आहे. या व्हिडिओत छेडछाड केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.