#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस

मुंबई – मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनया तसेच कॉमेडीने छाप सोडणार अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’ आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या मराठमोळ्या खासशैली तसेच धमाल विनोदी चित्रपटांमुळे तो नेहमीच सोशल माध्यमांमध्ये चर्चेत असतो.

 

View this post on Instagram

 

??‍♂️…. ? @yanky_3 #siddhumoments

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on


सिद्धार्थने अभिनय करियरची सुरुवात ‘तुमचा मुलगा काय करतो’ या मराठी नाटक पासून केली. पुढे मराठी चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीमुळे आणि वेगळ्या भूमिकांमुळे त्याने सिनेप्रेक्षकांच्या मनात छाप पडायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

??◽◾ #siddhumoments ? @bharatpawarphotography ? @styled_by_shweta @abito_clothing MUA by @vinodsarode

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on


सध्या आपल्या जोरदार लूकमुळे देखील सोशल माध्यमांच्या लाइमलाईट असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नवा लूक सोशल माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत आला होता, हा लूक ‘लग्नकल्लोळ’ या  चित्रपटातील होता.


शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी सिद्धार्थ आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंगने रसिकांची मनं जिंकतो. त्यामुळेच की काय नुकतंच त्याचे सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.त्याच्या लूक्स आणि स्टाइलबाबत तो फारच सजग बनला आहे. त्यामुळेच तो नेहमीच सिनेप्रेक्षकांच्या मनावर राज करीत असतो. अशा या कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधवला दैनिक प्रभातकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Leave A Reply

Your email address will not be published.