शाहजानपूर : चिन्मयानंद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या युवतीची सुटकाकरावी या मागणीसाठी निघणाऱ्या न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर 80 कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. जितिन प्रसाद आणि कौशल मिश्रा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले.
शाहजानपूर ते लखनौ अशी 180 किमिची ही यात्रा पाच दिवसामची असून त्यात ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग असेल. शहरात जमावबंदी ओद्श असतानाही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयापुढे सभा घेतल्याने त्यांना अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. कौशल मिश्रा, अजयकुमार लल्लू, धीरज गुज्जर यांचा अटक केलेल्यत समावेश आहे.
घराबाहेर एवढा बंदोबस्त का आहे, असे विचारले असता मला घरात नजरकैदेत ठेवल्याचे सांगण्यात आले. कोणतीही पदयात्रा काढता येणार नाही असे मिश्रा यांनी सांगितले. बलात्कार पिडितेच्या न्याय मागताना आम्हाला प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवले. उत्तर प्रदेशचे अजून काश्मीर झालेले नाही. हे भाजपा सरकार आमचे मुलभूत अधिकार पायदळी तुडवत आहे, असे ट्विट प्रसाद यांनी केले आहे.