नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 78 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या यादीनुसार मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर करनालमधून निवडणूक लढवणार आहेत. या यादीमध्ये 38 विद्यमान आमदाराना तिकिटे देण्यात आली आहेत, तर 7 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. हरियाणामध्ये एकूण 90 जागा आहेत.
तसेच भाजपमध्ये नुकत्याच सामील झालेली कुस्तीपटू बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त यांनाही भाजपने तिकिटे दिली आहेत. बबिता फोगट यांना दादरी व योगेश्वर दत्त यांना सोनीपतच्या बडोदा येथून तिकीट देण्यात आले आहे.
BJP releases its first list of candidates for Haryana Assembly elections. Wrestler Yogeshwar Dutt to contest from Baroda, Ex-hockey captain Sandeep Singh from Pehowa, and wrestler Babita Phogat to contest from Dadri, Haryana CM ML Khattar to contest from Karnal. pic.twitter.com/yMIHwpezkI
— ANI (@ANI) September 30, 2019
निवडणूक आयोगाने नुकतीच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली होती. 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणा येथे मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आणि अर्ज परत घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर रोजी असेल. लोकसभा निवडणुकीनंतर यंदाची ही पहिली राज्य निवडणूक आहे. हरियाणा विधानसभेची मुदत 2 नोव्हेंबरला आणि महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे.
BJP releases its first list of 78 candidates for #HaryanaAssemblyPolls. https://t.co/lxbhbqQA3J pic.twitter.com/ieueZ4d4Ip
— ANI (@ANI) September 30, 2019