निवडणुकीनंतर पडळकर पुन्हा वंचित मध्ये येणार

गोपीचंद पाडळकरांना प्रकाश आंबेडकरांच्या शुभेच्छा 

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. या वेळी बोलताना पडळकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. तसेच माझा वंचित मध्ये कुठलाही वाद नाही. परंतु समाजाच्या हितासाठी मी भाजपात प्रवेश करत आहे.

दरम्यान पाडळकरांच्या प्रवेशानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पडळकर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, लोकसभेला ते आमच्यासोबत होते, आता भाजपात गेले आहेत. परंतु निवडणुकीनंतर पडळकर पुन्हा वंचित बहुजन आघाडीत येतील, अशी अपेक्षा आंबेडकरांनी व्यक्त केलीये. वंचित बहुजन आघाडीने आत्तापर्यंत 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यांनंतर, आज एकूण 180 उमेदवारांची जाहीर करण्यात आली असून, उर्वरीत यादी मंगळवारी जाहीर होईल. त्यानुसार मंगळवारी रात्रीपर्यंत राज्यातील 288 उमेदवारांची यादी घोषित होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.