पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने म्हटले आहे की, गोव्यात आम्हाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सरकार स्थापन करण्यासाठी गैर भाजप पक्षांबरोबर आघाडी करण्याचा पर्याय आम्ही खुला ठेवला आहे. गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले की, जर कॉंग्रेसला 21 च्या बहुमताचा आकडा गाठता आलो नाहीं तर तर आम आदमी पार्टी (आप) सारख्या संघटनांचा पाठिंबा घेण्यास आम्ही तयार आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस बरोबरही आघाडी होऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षासोबत आघाडी करून येथील निवडणूक लढवली होती. राव म्हणाले की, अंतिम निकाल आल्यानंतर कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष आपला नेता निवडण्यात वेळ घालवणार नाही.
कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यास आम्ही त्याच दिवशी सरकार स्थापन करण्याचा दावा करू, असे ते म्हणाले.गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता, पण त्यावेळी सरकार स्थापनेच्या हालचाली करण्यास कॉंग्रेस पक्ष मागे पडला, त्या अवधीत भाजपने तेथे सरकार स्थापन केले होते. पण यावेळी मात्र आम्ही तसा वेळ दवडणार नाही असे राव म्हणाले.