वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स (Indian-origin astronaut Sunita Williams )या तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. मंगळवारी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानावर पायलट म्हणून पहिल्या क्रू चाचणी उड्डाणात त्या सहभागी होणार आहेत. बोइंगचे स्टारलाइनर फ्लोरिडातील केप कॅनवेरल येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण करेल. (Indian-origin astronaut Sunita Williams will go into space for the third time)
स्टारलाइनर विल्यम्स आणि बुच विल्मोरला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाईल. यामुळे अडचणीत सापडलेल्या बोईंग प्रोग्रामसाठी एक महत्त्वपूर्ण आणि बहुप्रतिक्षित मोहीम यशस्वी होईल. या अंतराळ उड्डाणासाठी आम्ही सज्ज आहोत.
आमच्या नातेवाईकांशी आणि मित्राशी याबद्दल चर्चा केली आहे. ते सर्व या मोहीमेबद्दल खूप उत्सुक आहेत आणि त्यांना आम्ही या मोहिमेमध्ये सहभागी होत असल्याचा अभिमान वाटचो आहे, असे विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
अंतराळयानाच्या विकासातील अडथळ्यांमुळे या मोहिमेला अनेक वर्षांपासून विलंब झाला आहे. जर ही मोहीम यशस्वी झाली, तर इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स च्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाऊन आणि तेथून अंतराळवीरांच्या वाहतूक उपलब्ध करून देणारी ही दुसरी खाजगी कंपनी बनेल.
तसे झाले तर स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्टारलाइनर दोन्ही कंपन्या नियमितपणे अंतराळ मोहिमा करू शकतील. यासाठी अममेरिकेची अंतराळ संस्था दीर्घकाळापासून प्रतिक्षेत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असेल, असे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन २२ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते.
सुनिता विल्यम्स यांना मोठा अनुभव…
विल्यम्स यांना मे १९८७ मध्ये युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीकडून युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये एनसाइन म्हणून कमिशन मिळाले आहे. त्यांनी एक्सपिडिशन ३२ वर फ्लाइट इंजिनियर आणि नंतर एक्सपिडिशन ३३ चे कमांडर म्हणून काम केले.
त्यांच्या पहिल्या स्पेसफ्लाइट, एक्सपिडिशन १४/१५ दरम्यान, विल्यम्स यांना ९ डिसेंबर २००६ रोजी एसटीएस-११६ च्या क्रूसोबत अंतराळात पाठवण्यात आले होते आणि ११ डिसेंबर २००६ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्या पोचल्या होत्या. अंतराळ स्थानकावरप असताना त्यांनी एकूण २९ तास आणि १७ मिनिटे चार स्पेसवॉक करणारी पहिली महिला होऊन महिलांसाठी जागतिक विक्रम प्रस्थापित केला.