Congress vs BJP । भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन भारतरत्न पुरस्कार प्रदान केला. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव लालकृष्ण अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचा उपस्थित राहू शकले नव्हते. दरम्यान, सध्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यातील एका फोटोवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लालकृष्ण अडवाणी याना पुरस्कार प्रदान करत आहेत. त्यावेळी राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान बसलेले आहेत. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र उगारले आहे.
देश की महामहिम राष्ट्रपति खड़ी हैं और PM मोदी बैठे हैं।
एक बार फिर PM मोदी ने जानबूझकर आदिवासी महिला राष्ट्रपति का अपमान किया है।
यह पहली बार नहीं है- जब नई संसद का उद्घाटन हुआ तब उन्हें बुलाया नहीं गया और राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम में भी राष्ट्रपति जी नहीं दिखीं।… pic.twitter.com/pbH2aR5CT4
— Congress (@INCIndia) March 31, 2024
देशाच्या महामहिम राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान मोदी बसले आहेत. पुन्हा एकदा पीएम मोदींनी आदिवासी महिला राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. ही पहिली वेळ नाही, नवीन संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातही राष्ट्रपती दिसल्या नाहीत. या घटनांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपाची मानसिकता महिलाविरोधी आणि दलितविरोधी असल्याचे दिसून येते.
देश की प्रथम नागरिक मतलब महामहिम ‘राष्ट्रपति’ जी का मान-सम्मान सर्व प्रथम और सर्वोपरि होना चाहिए। pic.twitter.com/SZ0FcwSFZP
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 31, 2024
“देशाच्या प्रथम नागरिकाचा म्हणजेच महामहिम राष्ट्रपतींचा आदर हा सर्वांत महत्त्वाचा असायला हवा”, असं समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
द्रौपदी मुर्मू जी यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली त्यावेळी भाजपाने त्यांच्या आदिवासी या समाजाचा हा सन्मान असल्याचं भासवलं होतं… पण आज त्याच महामहीम राष्ट्रपती महोदयांचा हा फोटो बघून मनात विचार आला, की भाजप नेमका सन्मान करतंय की अवमान? pic.twitter.com/VzXdb3L5D4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 31, 2024
“द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली, त्यावेळी भाजपाने त्यांच्या आदिवासी या समाजाचा हा सन्मान असल्याचं भासवलं होतं. पण आज त्याच महामहीम राष्ट्रपती महोदयांचा हा फोटो बघून मनात विचार आला, की भाजपा नेमका सन्मान करतंय की अवमान?”, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला.
(1/2) @yadavtejashwi जी, जब राष्ट्रपति जी किसी को कोई सम्मान देती हैं, तो पुरस्कार प्राप्त करने वाला व्यक्ति खड़ा होता है, जबकि समारोह में मौजूद अन्य गणमान्य लोग बैठे रहते हैं। ठीक इसी तरह आज राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी ने आडवाणी जी को जब सम्मान दिया, तो प्रधानमंत्री नरेंद्र… pic.twitter.com/H1NXStUeNc
— Vinod Tawde (Modi Ka Parivar) (@TawdeVinod) March 31, 2024
या फोटोंवरून वादंग निर्माण झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रपती जेव्हा एखाद्याला पुरस्कार देतात तेव्हा पुरस्कार घेणारा व्यक्ती उभा राहतो आणि इतर उपस्थित मान्यवर बसलेले असतात. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर बसून होते, असे स्पष्टीकरण विनोद तावडे आहेत.