Lok Sabha Election 2024| आगामी लोकसभा निवडणुक महाराष्ट्रात पाच टप्प्यात पार पडणार आहे. तर पहिला टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. पहिल्यातील टप्प्यातील उमदेवारांनी अर्ज देखील जाहीर केले आहेत. यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर ‘गाव तिथे बियर बार’ सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे. वनिता जितेंद्र राऊत या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या उमेदवार आहेत.या लोकसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात एकूण १५ उमेदवार आहेत.
कोण आहेत वनिता राऊत? Lok Sabha Election 2024|
वनिता राऊत ह्या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर येथून 2019 ची लोकसभा आणि 2019 मध्ये चिमूर विधानसभा निवडणुक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून दारूचे दुकाने उघडण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांच्या या अजब आश्वसानानंतर वनिता या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
हेही वाचा:
सोशल मीडियावर चर्चेत आलेले ‘Click here’ ट्रेंड काय आहे? येथे क्लिक करून जाणून घ्या माहिती