Vikrant Massey Son Vardaan| बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीच्या ’12वी फेल’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली. एकीकडे या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. हे कपल याच वर्षी 7 फेब्रुवारीला आई-बाबा झाले. शीतल ठाकूरने मुलाला जन्म दिला. याबाबत त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती देत आनंद व्यक्त केला होता.
विक्रांतने नुकताच आपल्या हातावर मुलगा वरदानच्या नावाचे टॅटू काढले आहे. त्याने सोशल मीडियावर टॅटूचा क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने आपल्या मुलाच्या हातावर वरदानच्या नावाचे टॅटू काढले असल्याचे दिसत आहे. इतकंच नाही तर त्याने वरदानच्या नावासोबत त्याची जन्मतारीख 7-2-2024 हे देखील लिहिले आहे.
हा फोटो शेअर करताना विक्रांत मॅसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ॲडिशन किंवा ॲडिक्शन, मला दोन्ही आवडतात.’ विक्रांत मेस्सीच्या या नवीन टॅटूचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे. सध्या त्याच्या या पोस्टवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.
विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, विक्रांत शेवटचा ’12वी फेल’ चित्रपटात दिसला होता. ’12वी फेल’नंतर विक्रांत मेस्सी ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता साबरमती एक्स्प्रेसची वेदनादायक कथा मांडताना दिसणार आहे. याशिवाय तो लवकरच तापसी पन्नूसोबत ‘फिर आयी हसीन दिलरुबा’मध्ये दिसणार आहे. सध्या त्याच्या या आगामी चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा:
साताऱ्याच्या जागेवर कोण होणार उमेदवार? ; जयंत पाटील-पृथ्वीराज चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा