नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 117 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 76 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बेळगावमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
#KarnatakaPolls | As per the ECI, Congress crosses the halfway mark in early trends, leads in 115 constituencies, BJP ahead in 73 seats while JDS leads in 29 seats.#KarnatakaElectionResults pic.twitter.com/s2sMx1L4JS
— ANI (@ANI) May 13, 2023
कल सारखे कमी जास्त होत आहेत. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.