मुंबई – भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पाय उतार झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. कारण आता देशमुख यांच्यावर ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल केला आहे.
अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात; आता ईडीनेही दाखल केला गुन्हा
माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 11, 2021
या कारवाईवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सडकून टीका केली असून ‘हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे’ असं म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले सचिन सावंत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे.