आता काळजी नाही! ‘या’ ठिकाणी मिळणार फक्त १ रुपयात ऑक्सिजन; फक्त एका ईमेलद्वारे मिळेल प्राणवायु

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान सुरु आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे आरोग्य सुविधे अभावी लोकांचे जीव जात आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून देशात ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचे बळी गेले आहेत. देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दोन एनजीओ पुढे आल्या आहेत. या एनजीओ तुम्हाला फक्त केवळ १ रुपयामध्ये ऑक्सिजन देणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त एक ईमेल करावा लागणार आहे.

नोएडाच्या एनजीओ चॅलेंजर्स ग्रुप आणि वॉइस ऑफ स्लम या दोन संस्था ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. जे करोनारुग्ण घरीच उपचार घेत आहे त्यांच्यासाठी या संस्था मदत करत आहेत. आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना या एनजीओ केवळ १ रुपयांमध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून देत आहे. हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर १० ते १५ दिवसांसाठी उपलब्ध केले जाते.

वॉइस ऑफ स्लमचे संस्थापक देव प्रताप यांनी याविषयी माहिती दिली. आता ५० कॉन्संट्रेटर मागवण्यात आले आहेत. यासोबतच मोठ्या प्रमाणात कॉन्संट्रेटरची ऑर्डर देण्यात आली आहे. तर दुसरी संस्था चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रिन्स शर्मा यांनी, गरजू लोक ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी चॅलेंजर्स ग्रुपचा ईमेल आयडी [email protected] आणि वॉइस ऑफ स्लमचा मेल आईडी [email protected] यावर संपर्क करू शकतात, असे म्हटले आहे.

अर्ज करणाऱ्या लोकांना रुग्णाचे आधार कार्ड, ऑक्सिजन सॅच्यूरेशन रिपोर्ट, कोरोना रिपोर्ट, डॉक्टरची रिसिप्ट आणि कुटुंबातील व्यक्तीचे ओळखपत्र व मोबाइल नंबर पुरावा म्हणून द्यावे लागेल. एनजीओकडून डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर ऑक्सिजन उपलब्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.