अहमदाबाद – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाच्या गुजरातमधील 13 जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. त्यामुळे गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीवरही कॉंग्रेस श्रेष्ठी नजर ठेऊन असल्याचे सूचित होत आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी कॉंग्रेसने गुजरात प्रदेश शाखेत नेतृत्वबदल केला. त्यानुसार, माजी खासदार जगदीश ठाकोर यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. त्यापाठोपाठ जिल्हा आणि शहर पातळीवरील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे गुजरात निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन कॉंग्रेसने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. त्या राज्यात नववर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे.
त्या निवडणुकांबरोबरच आगामी निवडणुकांसाठीही कॉंग्रेस सज्ज होत असल्याचे दिसते.