कॉंग्रेसने धार्मिक सलोखा जपून देशाचा विकास साधला : रमेश बागवे

पुणे – कोणत्याही कट्टरवादापेक्षा धार्मिक सलोखा हाच देशाला एकसंध ठेऊ शकतो. कॉंग्रेसने धार्मिक एकोपा जपून देशाचा विकास साधला, असे प्रतिपादन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमेश बागवे यांनी केले. या भागात मंगळवारी सकाळी झालेल्या पदयात्रेदरम्यान बागवे यांनी बाबाजान दर्गा, राम मंदिर, चर्च, बौद्ध विहारांनाही भेटी दिल्या. बाबाजान दर्गा येथे रमेश बागवे यांनी चादर चढवून माथा टेकवत आशीर्वाद घेतला. तर कॅम्पमधील राम मंदिरात जाऊन नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.

सर्वधर्म समभाव हाच भारताचा आत्मा असल्याचे नमूद करत बागवे यांनी सर्वधर्मियांच्या गाठीभेटी घेतल्या. दरम्यान, साचापीर स्ट्रीट येथून या पदयात्रेची सुरुवात झाली.

उमरशहा दर्गा, जुना मोदीखाना, सुप्रिया सोसायटी, सागर सोसायटी, बच्चू अड्डा, गवळीवाडा, दस्तुर मेहेर, कोकणी मोहल्ला, श्रीकृष्णा मंडळ, रेडिओ हॉटेल, दबाईर लेन, चारबावडी पोलीस चौकी, बाबाजान चौक, मार्गे केदारी रोड, शिंपी गल्ली, सेंटर स्ट्रीट, भीमपुरा, बंदर वस्ताद तालीम येथे समारोप झाला.

पदयात्रेस नगरसेवक रफिक शेख, माजी कॅन्टोन्मेंट सदस्य संगीत पवार, प्रसाद केदारी, मंजूर शेख, रशीद खिजर, आसिफ शेख, वाहिद बियाबानी, जॉन मोहमद शेख, अमीर सय्यद, सुवर्णा उरड, धनंजय उरड आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.