चिदंबरम आता ईडीच्या ताब्यात

तिहार मध्येच केली अटक

नवी दिल्ली  – आयएनएक्‍स मिडीया मनि लॉड्रिंग प्रकरणात सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेले माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना आता ईडीने अटक केली आहे. तिहार कारागृहात असलेले चिदंबरम यांच्यावर ईडीने तेथेच अटकेची कारवाई केली. त्यामुळे त्यांची कारागृहात चौकशी करण्याची अनुमती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

आज सकाळी सव्वा आठ वाजता ईडीचे अधिकारी तिहार मध्ये आले आणि त्यांनी चिदंबरम यांच्यावर तेथेच अटकेची कारवाई केली.हे पथक तिथे सुमारे दोन तास होते असे सांगण्यात येत आहे. सीबीआयने त्यांना 21 ऑगस्ट रोजी अटक केली होती. आता ईडीकडून त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली जाणार आहे.

आज सकाळी ही अटकेची कारवाई सुरू असताना त्यांचे चिरंजीव खासदार कार्ती आणि त्यांच्या पत्नी नलिनी याही तेथे उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.