Congress – AAP Alliance। लोकसभा निवडणूक 2024 साठी दिल्लीतून मोठी बातमी समोर आलीय. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात अखेर युती करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली.
आज दोन्ही पक्षाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात दोन्ही पक्षाच्या युतीची माहिती देण्यात आलीय. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी यावेळी, इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी लखनऊमध्ये सपा-काँग्रेस आघाडीची घोषणा करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आपकडून आतिशी, संदीप पाठक आणि सौरभ भारद्वाज, मुकुल वासनिक, दीपक बाबरिया आणि काँग्रेसकडून अरविंदर सिंग लवली उपस्थित होते.
आप ४ तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवणार Congress – AAP Alliance।
मुकुल वासनिक,यांनी दोन्ही पक्षातील कराराविषयी माहिती दिली. आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर दीर्घ चर्चा झाली. जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला. आम आदमी पार्टी दिल्लीत ४ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे मुकुल वासनिक यांनी सांगितले. काँग्रेसच्या खात्यात चांदणी चौकासह ३ जागा गेल्या. तर काँग्रेस चंदीगड लोकसभा आणि गोवा या दोन्ही जागांवर उमेदवार उभे करणार आहे.
हरियाणात काँग्रेस ९ जागांवर तर आम आदमी पार्टी १ जागा लढवणार आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष दोन तर काँग्रेस २४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आम आदमी पार्टी दिल्लीतील नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस ईशान्य, उत्तर पश्चिम आणि चांदणी चौक या जागांवर निवडणूक लढवणार आहे.
गुजरात, हरियाणा, गोवा आणि चंदीगडमध्येही युती Congress – AAP Alliance।
गुजरातमध्ये आम आदमी पक्ष भरूच आणि भावनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तर हरियाणात कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करणार आहेत. “सध्या भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आप-काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवू, पण एकदिलाने लढून भाजपचा पराभव करू, असे मुकुल वासनिक म्हणाले. दोन्ही पक्षांनी पंजाबबाबत कोणतीही माहिती दिली नाही, त्यानंतर या सीमावर्ती राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने ‘एकला चलो रे’ची रणनीती अवलंबण्याचे ठरवल्याचं स्पष्ट झालंय .