नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 611 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 80 हजार 980 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 94 टक्के इतके झाले असून, ते घटले आहे.
दरम्यान, आज जिल्हात रुग्ण संख्येत 692 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 978 इतकी झाली आहे. तसेच आज अखेर जिल्ह्यात 86 हजार 147 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 168, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 361 आणि अँटिजेन चाचणीत 163 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 56, अकोले 7, जामखेड 1, नगर ग्रामीण 2, पाथर्डी 7, राहाता 21, राहुरी 2, संगमनेर 47, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट 8, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 123, अकोले 7, जामखेड 3, कर्जत 6, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 24, नेवासे 37, पारनेर 14, पाथर्डी 5, राहाता 47, राहुरी 5, संगमनेर 19, शेवगाव 5, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 29, कॅन्टोन्मेंट 3 इतर जिल्हा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 163 जण बाधित आढळून आले. मनपा 41, अकोले 14, जामखेड 2, कर्जत 12, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 21, नेवासे 11, पारनेर 2, पाथर्डी 23, राहाता 7, राहुरी 7, शेवगाव 5, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 9, इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 196, अकोले 25, जामखेड 1, कर्जत 15, कोपरगाव 73, नगर ग्रामीण 30, नेवासे 4, पारनेर 20, पाथर्डी 24, राहाता 83, राहुरी 7, संगमनेर 75, शेवगाव 2, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 13, कॅन्टोन्मेंट 16 आणि इतर जिल्हा 6, अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपड्ेटस
बरे झालेली रुग्णसंख्या : 80980
उपचार सुरू असलेले रुग्ण : 3978
मृत्यू : 1189
एकूण रुग्णसंख्या : 86147