आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा

पिंपरी – मॅनेजर वारंवार रात्र पाळीची ड्यूटी देऊन त्रास देत असल्याने एका 25 वर्षीय तरुणाने 18 जानेवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास पिंपरीत रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आता मयत तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंपनी मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित विलास धावरे (वय 25, रा. बालाजीनगर, पावर हाऊस, टेल्को रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी गुरुवारी (दि.23) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोपान ऍण्ड एम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नेहरुनगर येथील शाखेच्या मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमित हा सोपान ऍण्ड एम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामाला होता. कंपनीची दुसरी शाखा नेहरुनगर येथे आहे. येथील मॅनेजर अमित याला वारंवार रात्र पाळीची ड्यूटी देत होते. त्यांना वारंवार विनंती करुन देखील त्यांनी अमित याची ड्यूटी बदलून दिली नाही. यामुळे कंटाळलेल्या अमितने 18 जानेवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास धावत्या रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×