कॉंग्रेसला आता पुर्णवेळ अध्यक्षाची गरज – संदीप दीक्षित

नवी दिल्ली – कॉंग्रेसला आता पुर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी व्यक्‍त केली आहे. कॉंग्रेस कमिटीतील सर्व वरीष्ठ नेत्यांनी हा नेतृत्वाचा विषय आता तातडीने हाता वेगळा केला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. पक्षाला सध्या अंतरीम अध्यक्ष असून ती जबाबदारी सोनिया गांधी यांच्यावर आहे. आता पक्षाने त्यांच्या जागेवर पुर्णवेळ अध्यक्ष निवडला पाहिजे. इलेक्‍शन पद्धतीने निवडा किंवा नियुक्ती पद्धतीने निवडा पण आता कॉंग्रेसला पुर्ण वेळ अध्यक्ष द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कॉंग्रेस मध्ये तरूण नेतृत्व आणि ज्येष्ठ नेतृत्व यांच्यात लढाई नाही असे नमूद करून त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांनी पक्षाच्या विरोधात जे बंड केले त्यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

कॉंग्रेस अध्यक्षा या नात्याने सोनिया गांधी यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. पण त्यांच्याकडे सध्या अंतरीम स्वरूपाचा कॉंग्रेस अध्यक्षपद आहे. अशा स्वरूपाच्या पदामुळे दीर्घकालीन स्वरूपाचे निर्णय घेण्यात मर्यादा येतात असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.