नवी दिल्ली – देशात कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. फक्त कांदा बियाणांच्या निर्यातीवर बंदी आहे. एप्रिल ते डिसेंबर या अवधीत देशाने 523.8 अब्ज डॉलर्सची कांद्यांची निर्यात केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
या मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, सरकारने केवळ कांद्याच्या बियाणावर बंदी घातली असून कांदा निर्यात मात्र सुरळीत सुरू आहे. एकट्या डिसेंबर महिन्यान देशाने 52.1 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे.
आत्तापर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास आधीच्या निर्यातीपेक्षा कांद्याची निर्यात वाढलीच आहे, असेही या मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
There is no ban on onion exports from India to any country and misleading statements suggesting the contrary is unfortunate.
Infact, from July-December 2022, onion exports have consistently been above the $40 million mark every month, benefiting our Annadatas. https://t.co/tGzwVHCt9J
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 25, 2023
कांदा निर्यातीवर बंदी असल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे, हे दुर्देवी आहे असे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटले आहे.