लंडन – युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेतील एका सामन्यात अत्यंत चिंताजनक घटना घडली. सेव्हिला व पीएसव्ही यांच्यातील लढतीत सेव्हिलाचा गोलरक्षक मार्को दिमित्रोविक याच्यावर एका प्रेक्षकाने हल्ला केला. या दोघांत घडलेल्या या घटनेची युरोपा लीगच्या आयोजकांनी चौकशी हाती घेतली आहे.
पीएसव्ही संघाच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सेव्हिलाचा गोलरक्षक मार्को दिमित्रोविक याच्यावर लढतीच्या उत्तरार्धात प्रेक्षकाकडून हल्ला करण्यात आला.
Supporter van PSV liep in de extra tijd het veld op om de doelman van Sevilla in de rug aan te vallen pic.twitter.com/WMA8iGMbj1
— AFQ (@AFQ_29) February 23, 2023
त्या हल्लेखोराने दिमित्रोविक याला मारहाण केली. यावेळी दीमित्रोविकने हा हल्ला चुकवण्याचाही प्रयत्न केला, मात्र यावेळी मैदानावर उपस्थित असलेल्या अन्य खेळाडूंसह पंचांनीही बघ्याचीच भूमिका घेतली.
ICC Women’s T-20 World cup : हरमनप्रीतने सांगितले पराभवाचे कारण, म्हणाली “सामन्यात आम्ही जे सोपे…”
पंचांनी सुरक्षारक्षकांना बोलावले व सामना काही काळ थांबवण्यातही आला. पीएसव्हीविरुद्धच्या या सामन्यात सेव्हिलाचा 2-0 असा पराभव झाला.