मुंबई – बॉलीवूड अभिनेता अजय देवगण ‘दृश्यम 2’ आणि ‘भोला’नंतर नव्या चित्रपटाच्या तयारी लागला आहे. अजयच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा तो आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी लागला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अजय सोबत अभिनेता आर. माधवनही दिसणार आहे. पहिल्यांदाच हे दोन अभिनेते एकत्र काम करणार आहेत.
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या टायटलची घोषणा झाली नाही. जून महिन्यापासून शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. मुंबई, म्हैसूर आणि लंडन येथे चित्रपटाचे शूटिंग पार पडणार आहे. कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांच्यासोबत अजय देवगणही या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट विकास बहल हे या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. ‘सुपर 30’ आणि ‘क्वीन’ हे चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.
R MADHAVAN JOINS AJAY DEVGN FOR SUPERNATURAL THRILLER… #RMadhavan will share screen space for the first time with #AjayDevgn in #PanoramaStudios’ supernatural thriller, directed by #VikasBahl… The film – not titled yet – will go on floors in June 2023 and will be extensively… pic.twitter.com/KDOPGWxB2L
— taran adarsh (@taran_adarsh) May 13, 2023
आर माधवन नुकताच रॉकेट्री: द नंबी इफेक्टमध्ये नंबी नारायणची भूमिका साकारताना दिसला होता. त्यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
तर 30 मार्च 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ चित्रपटात 30 मार्च 2023 रोजीवेगळा लूक पाहायला मिळाला. हा चित्रपट अजयचा आतापर्यंतचा सर्वात साहसी चित्रपट असल्याचे सांगितले जात होते. ‘भोला’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अजयसोबत अभिनेत्री तब्बूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.