करोनामुक्तांचा टक्का वाढला
पुणे – अनलॉकमुळे शहरात करोनाबाधितांची आकडेवारी दररोज सरासरी 800 ते 900चा आकडा गाठत आहे. पण, जूनचा अंतिम आठवडा पुणेकरांना दिलासा देणारा ठरला आहे. दि.26 जून ते 2 जुलै या आठवड्यात सुमारे 3,369 जण (एकूण नवीन बाधितांच्या तुलनेत 69.4 टक्के) करोनामुक्त झाले आहेत. हेच प्रमाण दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अनुक्रमे 48 आणि 46 टक्के होते.
शहरात खासगी कार्यालये सुरू झाल्यानंतर आठच दिवसांत करोनाने हातपाय पसरणे सुरू केले आणि जूनअखेरीस बाधितांच्या संख्येने तब्बल 20 हजारांचा टप्पा गाठला आहे. मात्र, एका बाजूला हे बाधित वाढत असतानाच; दिलासा देणारी आकडेवारीही महापालिकेने जाहीर केली आहे. दि. 5 जून ते 2 जुलै या चार आठवड्यात तब्बल 7,184 जणांनी करोनावर मात केली आहे.