सातारा – वाई तालुक्यातील चांदवडी पुनर्वसन या गावात राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते जयदीप शिंदे यांची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या विचाराच्या पॅनेलने सत्ता खेचून आणत विजय मिळवला आहे. सरपंच पद हे यापूर्वीच बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी गटाला यश आले होते.
चांदवडीच्या सरपंचपदी फरीद शेख यांची बिनविरोध निवड झाली असून सदस्यांच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या विचारांच्या पॅनेलचे पाच उमेदवार निवडून आले तर दोन उमेदवार हे कॉंग्रेसचे निवडून आले. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे रामदास पांडुरंग शिंदे (104 मते)
रेखा संतोष शिंदे (111 मते, स्नेहल अमोल शिंदे (124) मते, संतोष जनार्दन शिंदे (102 मते), यमुना सर्जेराव काकडे (101 मते) यांचा विजय झाला. तर कॉंग्रेसचे माजी सरपंच जयदीप शिंदे आणि उज्वला गोरवे हे दोनच उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीने सत्तांतर केल्यामुळे आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी सरपंच व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.