पाटण – पाटण विधानसभा मतदार संघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तेरा उमेदवारांनी एकूण वीस अर्ज दाखल केले. यामध्ये आ. शंभूराज देसाई यांनी चार तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तेरा उमेदवारांनी वीस अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये सुरेश संकपाळ (अपक्ष), अजितकुमार मोहिते (अपक्ष), सुभाष देसाई (अपक्ष), सागर जाधव (अपक्ष), विजयकुमार सुर्वे (अपक्ष), अशोकराव देवकांत (वंचित आघाडी), प्रकाश पवार (अपक्ष), सयाजीराव दामोदर खामकर (स्वराज्य सेना महाराष्ट्र)व सत्यजित पाटणकर दोन अर्ज शिवाजी भिमाजी कांबळे एक यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले.