सातारा – जिल्ह्याच्या पश्चिमेला धिम्या गतीने पाऊस सुरू असून धरणांच्या पाणीपातळीमध्ये धिम्यागतीने वाढ होत आहे. रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर झालेल्या पावसाने 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा 46.25 टीएमसीपर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर 10.10 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कण्हेर धरणामध्ये 5.47 टीएमसी तर 9.96 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या उरमोडी धरणात 4.10 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
13.50 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धोम धरणामध्ये 4.67 टीएमसी, 4.08 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या बलकवडी धरणात 2.02 टीएमसी आणि 5.85 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या तारळी धरणामध्ये 3.73 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.