‘मुख्यमंत्री प्रत्येक सभेत पवार-पवार शिवाय बोलतचं नाहीत’

चाळीसगांव: मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे. आणि कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही, असा पलटवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

शरद पवार म्हणाले, राज्यातील प्रश्न काय पण प्रधानमंत्री येऊन ३७० कलामाबद्दल पवारांनी उत्तर देण्याची मागणी करतात. अरे लोकांच्या पुढे ३७० हा प्रश्न नाहीये तर शेतीच्या समस्या महत्त्वाची आहे. यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली, कर्जबाजारीपणा का वाढलंय हे प्रश्न सोडविण्याचे सोडून ३७० पुढे करतात.

आजचे राज्यकर्ते कारखानदारी बंद करण्याच्या मागे आहेत. तरुणाच्या हातातील रोजगार काढून घेण्याचे काम यांनी केलंय. जेट सारखी एक कंपनी बंद पडली तर वीस हजार तरुण बेरोजगार झाले. यावर बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री प्रत्येक सभेत पवार – पवार याशिवाय काहीच बोलत नाहीत. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. मात्र आज विरोधकांचे तोंड दाबण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचे पवार म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)