‘या’ दिवसही होणार ‘हिरकरणी’ चित्रपट प्रदर्शित

मुंबई – हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं. गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे जी घरी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार आहे. मराठी अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे.

दरम्यान, आज कोजागिरीच्या मुहूर्तावर ‘हिरकरणी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे धाडसी रूप दिसून येत. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडणार आहे. अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित हा चित्रपट असणार असून, येत्या दिवाळीला म्हणजेच 24 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही सिनेरसिकांसाठी आनंदची ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.