मंचर- आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्या प्रचारासाठी मंचर शहरात “रोड शो’ व पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील सहभागी झाले होते.
या “रोड शो’मध्ये उद्योजक अक्षय आढळराव पाटील, माजी संपर्कप्रमुख अविनाश रहाणे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुरेश भोर, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, भाजपचे सहसंपर्क जयसिंग एरंडे, भाजपाचे नेते डॉ. ताराचंद कराळे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, युवासेना उपजिल्हाप्रमुख कल्पेश बाणखेले, भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र त्रिवेदी, मनसेचे उपजिल्हाप्रमुख वैभव बाणखेले यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते. पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आढळराव पाटील यांनी सर्वांना हात जोडून उमेदवार राजाराम बाणखेले यांना मतदान करावे, असे आवाहन केले.