पुणे – राज्यशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्च आणि मेच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच, धर्तीवर पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात केली जाणार आहे. तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या कपातीतून वगळण्यात आले आहे.
राज्यात करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशा स्थितीत राज्यातील आर्थिक स्थितीही मंदावलेली आहे. राज्यात 15 मार्चपासूचन लॉकडाउनची स्थिती आहे. त्यातच 31 मार्चअखेरपर्यंत शासनास वेगवेगळ्या घटकांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक वर्ष संपतना शासनाच्या तिजोरीत निधी जमा होतो. अशा स्थितीत, लॉकडाउन तसेच करोनाशी लढण्यासाठी आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक खर्च करण्याची जबाबदारी शासनाला पेलावी लागणार आहे. त्याच, धर्तीवर पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, वर्ग 1 आणि 2 च्या कर्मचाऱ्यांना मार्चचे वेतन 50 टक्के, तर वर्ग 3 कर्मचाऱ्यांचे वेतन 25 टक्के कापण्यात येणार आहे. तर वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना या वेतन कपातीमधून वगळण्यात येणार आहे.