तळेगाव ढमढेरे – करोनामुळे लॉकडाऊन असताना शिरूर तालुक्यामधील टाकळी भीमा येथील शेतकरी उमेश काळे यांनी आपल्या शेतातील पिकवलेला भाजीपाला समाजातील गरजू व्यक्ती व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना दिला आहे.
हा भाजीपाला ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, शिक्रापूर पोलीस स्टेशन कर्मचारी तसेच गावातील गरजूंना वाटप केला आहे. करोना महामारीचे संकट आल्याने आपण समाजाचे काही देणे लागतो ही सामाजिक भावना मनात असल्याने माणूसकी म्हणून स्वतःच्या शेतात पिकविलेला भाजीपाला देऊन माणूसकी जपण्याचा प्रयत्न केल्याची भावना काळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.