किमान 26 ठार झाल्याची प्राथमिक माहिती
बॅंकॉक – म्यानमारमध्ये लष्कर आणि बंडखोरांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली असून या हिंसाचारात किमान 26 जण ठार झाले आहेत. यामध्ये 6 लहान मुलांचाही समावेश आहे. म्यानमारची राजधानी नायपितॉच्या पूर्वेकडील भागात ही जोरदार चकमक झाल्याची माहिती मिळते आहे. या भागातील नागरी हक्कविषयक गट आणि वैद्यकीय सहायता गटांनी याबाबतची माहिती दिली आहे. शान प्रांताच्या पेकोन वसाहतीमध्ये हा संघर्ष झाला.
27 मे रोजी 100 हून अधिक सैनिकांनी मोबीच्या एका गावाच्या दिशेने गेले आणि सुमारे 100 रहिवाशांना अटक केली, त्यापैकी बहुतेकांना दोन बौद्ध मठांमध्ये काही दिवस नजरकैदेत ठेवल्यानंतर सोडण्यात आले होते. काही गावकरी अटक टाळण्यासाठी त्यांच्या घरात लपून बसले होते. त्यांच्यापैकी काही जणांना एकतर त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून मारण्यात आले किंवा ते रस्त्यावर उतरले तेंव्हा लष्कराच्या हल्ल्यात मारले गेले, असे नोबीच्या रहिवाशांनी सांगितले.
फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने आंग सान स्यू की यांचे सरकार बरखास्त करून म्यानमारची सत्ता ताब्यात घेतल्यापासून या भागात लष्कर आणि बंडखोरांमध्ये नेहमीच तणाव राहिलेला आहे. लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्याने देशभर व्यापक प्रमाणात सार्वजनिक निदर्शने झाली. सुरक्षा दलांनी केलेल्या हिंसक दडपशाहीमुळे सशस्त्र प्रतिकार सुरू झाला. हा प्रतिकार आता देशाच्या बऱ्याच भागात पसरला आहे.
नुकत्याच झालेला संघर्ष मोबी परिसरात झाला.
मोबी हा सुमारे 175 चौरस किलोमीटर परिसरात व्यापलेल्या गावांचा समूह आहे. हा गावांचा समूह राजधानी नायपितॉच्या पूर्वेला सुमारे 100 किलोमीटरवर आहे. या भागातील कारेन्नी वांशिक गट लष्करी शासनाविरोधात संघर्ष करत आहेत. हा गट “पीपल्स डिफेन्स फोर्स’ या बंडखोरांच्या संघटनेचाच एक घटक आहे.