टीव्हीवरून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर आता साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार्ससोबत काम करताना दिसणार आहे. मृणालने सुपर ३० मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर ती ‘तुफान’, ‘जर्सी’ आणि ‘गुमराह’मध्ये दिसली, परंतु मृणालचे हे चित्रपट फ्लॉप ठरले.
अशात आता मृणाल ठाकूरने साऊथ इंडस्ट्रीकडे मोर्चा वळवला आहे. दरम्यान, मृणाल ठाकूरने तिच्या नव्या साऊथ सिनेमाची घोषणा केली आहे. सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत तिने तिसरा साऊथ चित्रपटही साइन केला आहे. लवकरच मृणाल या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सचा आगामी चित्रपट ‘SVC54’ साठी तिला सामील करण्यात आले आहे.
मृणालने श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स या सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसशी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर पहिल्यांदाच विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अतिशय छान प्रवासाची ही पहिली पायरी आहे.
श्री वेंकटेश्वर क्रिएशन्ससोबत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. विजय देवराकोंडासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मृणालने विजयसोबत अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. मृणाल ठाकूरने ‘सीता रामम’ या चित्रपटाद्वारे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात मृणाल ठाकूरची जोडी दुलकर सलमानसोबत दिसली होती. याशिवाय सुमंत, थरूण भास्कर, गौतम मेनन, भूमिका चावला आणि मुरली शर्मा हे देखील चित्रपटात दिसले होते.